टेनिस क्रिकेट असोसिएशन इंडिया आणि टेनिस क्रिकेट असोसिएशन उत्तर प्रदेश यांच्या संयुक्त विद्यमाने सातवी राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा उत्तर प्रदेश मधील मथुरा येथे २२ जून ते २६ जून या कालावधीमध्ये होणार आहे या स्पर्धेसाठी मबंईमे महाराष्ट्राचा संघ जाहीर करण्यात आला आहे
महाराष्ट्र टेनिस क्रिकेट संघामध्ये मुंबई उपनगर संघामधील अभिषेक मोडकर, प्रकाश पराडकर, उत्कर्ष जुवाटकर, अभिषेक सांगळे, रोहन चव्हाण, तन्मय बांदेकर, वेदांत जाधव, सुदेश नारकर, आकाश मसुरकर, मानस पाटील या खेळाडूंची निवड केली आहे. अशी माहिती महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशन मुंबई सचिव श्री संदीप पाटील यांनी दिली. निवड झालेल्या खेळाडूंना १८ जून ते २० जून रोजी नाशिक येथील मोदी मैदान या ठिकाणी मुंबई महाराष्ट्र विदर्भ या संघांची सराव चाचणी होणार आहे सराव चाचणी घेण्यासाठी महाराष्ट्र सचिव मीनाक्षी गिरी,महाराष्ट्र टेक्निकल डायरेक्टर स्वप्निल ठोंबरे, विजय उंबरे, महेश मिश्रा, इंद्रजीत, संदीप पाटील, सिद्धेश गुरव, सुशील तांबे अमित गोलतकर राजेद्र राजम उपस्थित राहणार आहेत.
मुंबईच्या अनेक क्षेत्रांमधून खेळाडूंचे अभिनंदन केले जात आहे .
अखिल भारतीय गाबीत समाज संस्था अध्यक्ष श्री परशुराम उपरकर, कार्याध्यक्ष श्री दिगंबर गावकर, श्री बबन सारंग, श्री गणेश फडके, श्री.धनंजय मुणगेकर,श्री.विष्णू प्रभू,श्री.अमित गोलतकर,श्री.संतोष कडू,श्री.राजेश पावसकर,श्री. विश्वास घाग, श्री.संजय नलावडे,
श्री. प्रशांत भाबल,श्री.दत्ता पोसम,श्री.गणेश कुबल,श्री. उमेश येरागी,श्री.दीपक ढोके
त्याचबरोबर सिंधुदुर्ग क्रिकेट असोसिएशन सिंधुदुर्ग जिल्हा या सर्वांनी खेळाडूंचे अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या आहेत.