मंचर पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक 16/06/2023 रोजी सकाळी 08.00 वा. ते दुपारी 03.00 वाजण्याचे दरम्यान माळवाडी पिसोळा मळा मंचर येथील जमिन गट नंबर 149/6 या मध्ये ता. आंबेगांव जि. पुणे. येथे कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणास्तव फिर्यादी नामे संदीप पंढरीनाथ थोरात यांचे वडील पंढरीनाथ बाबुराव थोरात वय 73 वर्षे रा. मुळेवाडी रोड माळवाडी मंचर, ता. आंबेगांव जि. पुणे. यांचे डोक्यात कशाचे तरी सहायाने मारहाण करून त्यांना गंभीर दुखापत करून त्यांना विहीरीचे पाण्यात टाकुन देवुन त्यांचा खुन केल्याच्या तक्रारीवरून नंतर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 270/2023 भादवि कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास
मंचर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भालेकर यांच्याकडे सोपविण्यात आलेला होता. या गुन्ह्यातील आरोपी हा खून करून त्याचे लपून बसलेला होता. सदर आरोपीचा शोध घेण्यासाठी मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांचे आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भालेकर, पोलीस हवालदार नाडेकर ,पोलीस कॉन्स्टेबल माताडे ,पोलीस कॉन्स्टेबल रोडे ,पोलीस कॉन्स्टेबल पवार या तपास पथकाने तपासाची विविध तंत्रे वापरून अथक परीश्रम घेवुन सदर आरोपी बाबत अचूक माहिती प्राप्त केली व गुन्हा घडल्यापासून 24 तासाच्या आत उघडकीस आणलेला आहे .
आज दिनांक 17/6/2023 रोजी आरोपी नामे मच्छिंद्र पांडुरंग गुंजाळ ,वय 55 वर्ष ,राहणार मुळेवाडी रोड, मंचर, तालुका आंबेगाव जिल्हा पुणे याचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले. आरोपीस ताब्यात घेतल्यानंतर त्याचे जवळ कसून विचारपूस केली असता आरोपीने सदर गुन्हा केला असल्याची कबुली दिली आहे. त्यानंतर आरोपी यास कायदेशीर अटक करण्यात आली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे .
सदर कारवाई ही मा. अंकीत गोयल ,पोलीस अधिक्षक ,पुणे ग्रामीण,
मा. श्री. मितेश घटटे, अपर पोलीस अधिक्षक ,पुणे ग्रामीण, मा. श्री. सुदर्शन पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी खेड, विभाग खेड, यांचे मार्गदर्शनानुसार मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश होडगर, सपोनि किरण भालेकर, पोसई शेटे, पो.हवा नाडेकर , पो हवा , राजेश नलावडे, पो.ना. सोमनाथ वाफगांवकर, पो.कॉ.दिनेश माताडे, पो कॉ. योगेश रोडे पोलीस कॉन्स्टेबल अजित पवार,पो.काॅ. संदीप रावते, पो कॉ. अविनाश दळवी यांनी केलेली आहे .
प्रतिनिधी - आकाश भालेराव
मंचर