मोखाडा :-सचिन पाटील
.
खोडाळा:- खोडाळा ग्रामपंचायत ही मोखाडा तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते मात्र त्याच प्रमाणे सर्वात सोई सुविधानी ही या ग्रामपंचायतीची आपली तालुक्यात ओळख आहे मात्र काही तांत्रिक अडचणी मुळे आता ही ग्रामपंचायत अडचणीत आली आहे यात सर्वात महत्वाचा मुदा म्हणजे आरोग्या साठी लागणारे पिणारे पाणी हे आहे,
गेले 4 ते 5 महिने आता खोडाळा ग्रामपंचायतीला येत असलेले नळाचे पाणी ही खूप दुषित व तेलकट स्वरूपाचे पाणी पिण्यासाठी येत आहे यातच सर्व सामान्य जनता ही ना ईलाजाने तेच पाणी स्वयपाक करायला व पिण्याला वापरत आहे व आपल्या आरोग्याशी लढत आहे,
काही गावातील व्यापारी मंडळी हे पाणी न पिता अक्कवा घेतात तर काही मंडळी फक्त पाणी वापरण्यासाठी भरत असतात याचा मात्र सर्व सामान्य जनतेला मोठा त्रास सहन करावा लागतो त्यांना रोजच पाणी विकत अक्कवा घेण्याचं परवडत नाही म्हणून ना ईलाजाने तेच पाणी पिवे लागते ग्रामस्थानी ही मागच्या ग्रामसभेत यावर चर्चा केली होती मात्र त्यांना समाधानी उत्तरे न मिळाली आहे जनतेच फक्त एवढेच म्हणणं आहे की ग्रामपंचायतीला सत्ता कोणाची पण असुद्या मात्र आम्हाला पाणी व मूलभतं सुविधा ह्या वेळेवर व उत्कृष्ट भेटल्या पाहिजे गेली कित्येक कामे ही लाखो रुपये खर्चून केली जातात मात्र ते निकृष्ट स्वरूपाचे केली जातात म्हणून येणाऱ्या काही दिवसातच ती केलेली कामे खराब होतात याकडे लक्ष दिले पाहिजे सर्व सामान्य जनतेच्या आरोग्याशी खेळले नाही पाहिजे असा संताप जनतेतून विचारला जात आहे.