मोखाडा :- सचिन पाटील
खोडाळा:(सचिन पाटील)- खोडाळा विभागातील सामाजिक कार्यकर्ते,कारेगाव,कडूची वाडी येथील सरपंच निसर्गवासी देवराम कडू साहेब यांचे चिरंजीव सामाजिक कार्यकर्ते आकाश कडू यांनी आपली सामाजिक बांधिलकी जपत जिल्हा परिषद शाळेतिल विध्यार्थ्यांना एन पावसाळ्यात पाण्याचा सामना करावा लागतो त्यापासून बचावं करण्यासाठी त्यांनी शाळेतील विध्यार्थ्यांना निसर्गवासी देवराम कडू (सरपंच) यांच्या स्मरणार्थ छेत्र्या वाटप केल्या आहेत ,
आपण ही जिल्हा परिषद शाळेत आपले शिक्षण पूर्ण केले आहेत यावेळी खूप काही अनुभव घेतले आहेत काही विद्यार्थी हे खूप गरीब असतात त्यांना वेळेवर छेत्रि ही मिळत नाही अर्धा पावसाळा निघून जातो विद्यार्थी तसेच एक मेकांच्या छे त्रित शाळेत ये जा करतातं व त्यांच्या आरोग्याशी ते खेळतात याचा विचार करून आपण एक सामाजिक बांधिलकी जपत विध्यार्थ्यांना एक छोटीसी मदत केली आहे असे सामाजिक कार्यकर्ते आकाश कडू यांनी यावेळी बोलताना सांगितले यावेळी जि.प.शिक्षक शिंदे सर ,भिसे सर सामाजिक कार्यकर्ते राजू कडू,अशोक भोई संदीप कडू,नयन कडू इत्यादी उपस्थित होते.