Type Here to Get Search Results !

अजंता ॲग्रो मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड तर्फे भव्य स्वयंरोजगार उद्घाटन सोहळा संपन्न.




जव्हार :-सोमनाथ टोकरे 


शासन आपल्या दारी पालघर जिल्ह्यातील शुभारंभ दरम्यान भारत सरकार कृषी मंत्रालय प्रमाणित खासदार राजेंद्र गावित पालघर लोकसभा यांच्या सहकार्याने अजंता ॲग्रो मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड तर्फे गणेश नगर जव्हार येथे भव्य स्वयंरोजगार उद्घाटन सोहळा ऑनलाइन प्रणाली द्वारे मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला. महिलांना प्रगत शिवणकामातून स्वयंरोजगार व महिला सक्षमीकरण करून रोजगार उपलब्ध होणार असल्याचे यावेळी सांगितले गेले. सदर कार्यक्रमासाठी गणेशनगर येथे युवा उद्योजक कॅप्टन विनीत मुकणे ,विभागीय अध्यक्ष यशवंत देशमुख, महिला प्रमुख भावना ताई पवार ,व इतर पदाधिकारी उपस्थित होते. अजंता ॲग्रो मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड तर्फ़े जव्हार तालुक्यात तसेच पालघर जिल्हातील इतर तालुक्यात शेतकऱ्यांना साठी व महिला बचत गटांची निर्मिती करून त्यांना कायमस्वरूपी रोजगार निर्मिती व्हावी या उद्देशाने विविध उपक्रम राबवले जात आहेत. जव्हार मोखाड़ातालुका हा आदिवासीबहुल तालुका असून या भागात पावसाळ्यानंतर शेतकऱ्यांना व महिलांना हाताला काम नसते त्यामुळे मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत असते हे स्थलांतर थांबावे यासाठी अजंता ॲग्रो मल्टीस्टेट को ऑप सो लि मार्फत विविध उपक्रम राबवून प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये स्वयंरोजगार केंद्र निर्मिती करून त्यांना स्वतःच्या गावातच रोजगार कसा उपलब्ध होईल यासाठी या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. सदर कार्यक्रमासाठी जव्हार मोखाडा विक्रमगड तालुक्यातील महिला बचत गटातील भगिनी व शेतकरी बचत गटातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी विविध वस्तूंचे वाटप व शेतकऱ्यांना बियाण्याचे वाटप करण्यात आले.



कोट-

 पालघर जिल्ह्यातील जव्हार-मोखाडा तालुक्यातील होणारं स्थलांतर व येथील कुपोषण समस्या दूर करण्यासाठी गावात महिलांना स्वतःचा व्यवसाय करता यावा यासाठी स्वयंरोजगार केंद्र सुरू केले असून या माध्यमातून स्थलांतर कमी होण्यास मददत होणार आहे तसेच जास्तीत जास्त शासनाच्या विविध योजनांचा लाभ येथील आदिवासी बांधवाना कसा मिळेल यासाठी अजंता ॲग्रो मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी च्या माध्यमातून काम सुरू आहे.


राजेंद्र गावित

खासदार पालघर लोकसभा मतदारसंघ


कोट-



ग्रामीण आदिवासी भागातील महिलांना जास्तीत जास्त रोजगार कशा उपलब्ध होईल व त्यांना शासनाच्या विविध योजनांच्या लाभ मिळवून महिलांचे होणारे स्थलांतर व कुपोषण या समस्या सोडवण्यासाठी आम्ही अजंता ॲग्रो मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या माध्यमातून काम करीत आहेत व त्याला चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळत आहे.


अजित गोसाळकर

चेअरमन अजंता ॲग्रो मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News