डोंबिवली एमआयडीसी निवासी भागात सद्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण काम सुरू असून कॉंक्रिटीकरण केल्यावर त्यावर एक सारखे पाणी मारणे अत्यंत आवश्यक आहे. गेल्या काही दिवसांपासून मिलापनगर तलाववर पंप लाऊन ते पाणी टँकर द्वारे घेऊन जात असल्याचे स्थानिक रहिवाशांना दिसुन् आले.
त्यातील काही टँकर नवीन बनविल्या रस्त्यावर पाणी मारताना दिसत आहेत तर काही टँकर अन्य ठिकाणी पाणी घेऊन जात आहेत. स्थानिक रहिवाशांनी मात्र याला विरोध दर्शविला आहे. जर एमएमआरडीएचा ठेकेदार हे रस्त्यांचे काम करतांना तलावातील पाणी कोणाच्या परवानगीने उचलत आहे किंवा त्याला टँकरने हे पाणी कोण पुरवीत आहे याची माहिती कोणीच देत नसल्याचे येथील राहिवशान् कडून सांगण्यात आले .
सदर तलावात जलचर प्राणी (मासे, कासवे ) भरपूर प्रमाणात असून तलावातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास व त्यात बाहेर अत्यंत कडक उन्हाळा असल्याने जलचर प्राण्यांना ते धोकादायक होऊ शकते. सदर तलावाची नियमित साफसफाई केडीएमसी कडून होताना दिसत नाही. त्यात नेहमी मोठ्या प्रमाणात निर्माल्य, कचरा पडलेला असतो. केडीएमसी स्वच्छता निरीक्षक यांच्याकडे नागरिकांनी चौकशी केली असता त्यांनाही याबद्दल काहीच माहिती नसल्याचे दिसले. रस्ते काँक्रीटीकरण बाबतीत सर्वच सरकारी यंत्रणांनी समन्वय न साधल्याने एकंदर खराब परिस्थिती येथे निर्माण झाली आहे.
प्रतिनिधी /भानुदास गायकवाड