जव्हार :-सोमनाथ टोकरे
जव्हार तालुक्यातील ग्रामपंचायत कासाटवाडी मध्ये लोकनियुक्त सरपंच कल्पेश विनायक राऊत यांच्या प्रयत्नातून सुसर माळी गावात आज विजेचे दर्शन झाले.गेली अनेक वर्षापासून हे गाव विजेपासून व अनेक विकास कामांपासून वंचित होते गाव अस्तित्वात आल्यापासून इथे वीज नव्हती परंतु लोकनियुक्त सरपंच श्री.कल्पेश विनायक राऊत यांच्या प्रयत्नातून आणि सहकार्यातून आज या गावात घराघरात वीज आली असून विकास कामे सुद्धा चालू करण्यात आली गावात स्ट्रीट लाईट बसवण्यात आली, गावात विहीर दुरुस्ती करून खोलिकरणाचे काम पूर्ण झाले आहे आणि पुढील काही दिवसांत पावसाळा संपल्यावर गावात जाणारा खडीकरण रस्ता, काँक्रीटीकरण रस्ता, व गळीबोळ पेव्हर ब्लॉकचे काम लवकरच पूर्ण होणार आहेत तसेच सरपंच आता थेट जनतेमध्ये जाणून तेथील ग्रामस्थांच्या अडचणी तात्काळ सोडवत असल्यामुळे लोकांमध्ये आनंदाचे वातावरन आहे, येथून पुढे सुद्धा मोठ्याप्रमाणात विकास कामे होतील त्याच बरोबर माणसांना रोजगार मिळणार आहे
या प्रसंगी सरपंच,ग्रामविकास अधिकारी , उपसरपंच, सदस्य सर्व उपस्थित राहून ग्रामस्थांनी सर्वांचे स्वागत केले.