जव्हार :-सोमनाथ टोकरे
ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन १ ऑगस्ट २०१४ साली पालघर जिल्हा हा स्वतंत्र करण्यात आला .पालघर जिल्हा हा अतिदुर्गम आणि मागासलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो या मध्ये ८ तालुका असून पालघर जिल्हामध्ये जवळपास आदिवासीची वस्ती ही ९५ टक्के आढळून येते या मध्ये जव्हार आणि मोखाडा तालुक्यात बेरोजगार नसल्याने या भागात जास्त आर्थिक परिस्थिती बेडसावत आहेत त्यामुळे इथले नागरिक हे स्वतः चे पैसे कसे बचत होईल या दृष्टीने मोह झाडाच्या बियापासून पासून खाद्य तेलाची निर्मिती करून पावसाळा भर याचा उपयोग करत असतात.
मोह ही वनस्पती या भागात खूप महत्त्वाची ठरली आहे.उन्हाळा मध्ये फुले येतात त्यांच्यावर सुध्दा प्रकिया करून त्यांचे अनेक फायदे आदिवासी नागरिक करत असतात त्यानंतर १,२ महिन्यानंतर त्याला बिया येतात ( मोस्ट) ते घरी आणून त्यांचे २ चीप्त करून उन्हामध्ये पूर्ण पने वाळवून घेतात नंतर तेलाची घानी मध्ये नेवून त्यावर प्रकिया करून तेलाची निर्मिती करत असतात त्यातच पावसाळा पुरेल इतके तेलाची निर्मिती करत असतात.
त्यामुळे मोह झाडाच्या बियापासून तेलाची निर्मिती करत असतो.( काशिनाथ बुधर रीठीपाडा ग्रामस्थ )