जव्हार - सोमनाथ टोकरे
सागरी डोंगरी नागरी अशी ओळख असलेले पालघर जिल्हाची निर्मिती 1 ऑगस्ट 2014 रोजी करण्यात आली.
स्वतंत्र आदिवासी बहुल पालघर जिल्हा निर्मिती नंतर आदिवासी बाधव कुपोषित व अभावग्रस्तच राहिला आहे.
आदिवासींचे मूलभूत प्रश्न तातडीने सोडवले जाणार अशी अपेक्षा होती मात्र ती फोल ठरली आहे.
स्वतंत्र आदिवासी जिल्हा निर्मिती नंतर काय साध्य काय झाले असा आज ही प्रश्न निर्माण होताना दिसतो.
जव्हार जिल्ह्या निर्मितीची आस असतांना पालघर जिल्हा निर्माण झाल्याने आज ही जव्हार जिल्ह्याची आदिवासी समाज वाट बघत आहे.
आदिवासी समाजाच्या विकासासाठी शासन मोठया प्रमाणात कोट्यवधी रुपये खर्च करत आले आहे. स्वातंत्र्य काळापासून केलेला खर्च बघता आजतागायत आदिवासी बांधवांचे
स्थलांतर रोखण्यासाठी पर्यटन हाच एकच प्रभावशाली व शाश्वत मार्ग आहे. आदिवासी बांधवांच्या हाताला रोजगार मिळेल.
जव्हार तालुक्यात पर्यटन माध्यमांतून विकास झाल्यास आदिवासी भागाचा कायापालट होईल आणि आदिवासी बांधव आथिर्क दृष्टीने परिपूर्ण होईल.
आथिर्क स्थिती चांगली झाल्यास कुपोषण निर्मूलन होण्यास वेळ लागणार नाही.
त्यामूळे निसर्गाने नटलेल्या जव्हार तालुक्यात नैसर्गिक साधन संपत्तीला हात न लावता विकास करावा लागेल. सिमेंटचे जंगल न होता, जी पर्यटन स्थळ आहेत त्यातच भर टाकली तर आणखी काही आकर्षण वाढेल
सध्या पालघर जिल्ह्यातील सामाजिक आर्थिक परिस्थिती आणि नैसर्गिक संसाधनामधील असमानता व जलद शहरीकरणाच्या आव्हानांसमोर जाण्याची आवयश्कता विचारात घेवून प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हा विकास आराखडा (District Strategic Plan) तयार करण्यात येणार आहे. पालघर जिल्हा विकास आराखडा तयार करताना जिल्ह्यातील विकासाच्या संभाव्य संधी लक्षात घेवून त्यानुसार गुंतवणूक व विकासाला चालना देणाऱ्या बाबी तसेच कृषि व संलग्न सेवा, उद्योग (वस्तुनिर्मितीसह), जलसंधारण, पायाभुत सुविधा, शिक्षण, आरोग्य, पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यव्यवसाय, रोजगार व स्वयंरोजगार, कौशल्य विकास, पर्यटन इत्यादी क्षेत्रांतील वृद्धी करण्याबाबत पालघर जिल्हाधिकारी यांनी जव्हार तालुक्यातील पर्यटन जाणकार पारस सहाणे तसेच जिल्ह्यातील अन्य मंडळींच्या सूचना मागवल्या होत्या . यासाठी जव्हार तालुक्यातील पर्यटन अभ्यासक सामाजिक कार्यकर्ते ॲड. पारस सहाणे यांनी जव्हार तालुक्याचा विकास आराखडा जिल्हाधिकाऱ्यांना नुकताच सादर केला आहे.
यामध्ये त्यांनी सुचवलेल्या सूचना स्वीकारल्यास जव्हार तालुक्याचा कायापालट होईल.
जव्हार जिल्हा निर्मिती,रेल्वे,पर्यटन,कृषी,शिक्षण, आरोग्य सुविधा, मोहाच्या फुलांवर प्रक्रिया करून मद्य निर्माती , पाणी आडवा, महामार्ग, मिनी ट्रेन,जव्हार शहर विकास , वन संवर्धन,
अशा अन्य सूचना सुचवल्या आहेत.
जव्हार जिल्हा निर्मिती,रेल्वे,पर्यटन,कृषी,शिक्षण, आरोग्य सुविधा, मोहाच्या दारूची कारखाना, पाणी आडवा, , राष्ट्रीय महामार्ग, जव्हार शहर विकास , वन संवर्धनासाठी सेंट्रल पार्कच्या धर्तीवर पार्क , मिनी ट्रेन, पोलीस भरती केंद्र, केंद्रीय इंग्रजी विद्यालय , स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच स्मारक, जुन्या राजवाडा पुनर्विकास अशा अन्य सूचना सुचवल्या आहेत.
स्वतंत्र आदिवासी बहुल पालघर जिल्हा निर्मिती नंतर आदिवासी भागाची अपेक्षा होती. मात्र ती फोल ठरली आहे.
जव्हार तालुक्याचा नियोजनबध्द विकास होणे आवश्यक आहे. ठेकेदारांना हवे तसे कामे नको तर जनतेच्या मनातील जव्हार विकसित करणे आवश्यक आहे.
शिक्षण, आरोग्य,पर्यटन यावर सरकारचे लक्ष वेधले आहे.
-ॲड.पारस सहाणे,
सामजिक कार्यकर्ते, जव्हार