आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील शेतकऱ्यांची भात पेरणीची लगबग सुरू झाली आहे. पावसाची वाट न पाहता रोहिणी नक्षत्राचा मुहूर्त साधण्यासाठी धूळवाफेवर भात पेरणीची लगबग असल्याची पाहायला मिळत आहे.
मान्सून पाऊस जवळ येत जातो. त्याप्रमाणे शेतातील कामाची लगबग मोठ्या प्रमाणात सुरू होते. पेरणीच्या अनेक पध्दती आहेत. त्यातील एक म्हणजे वेळेत धूळवाफ पेरणी. ७ जुन रोहिणी नक्षत्राचा शेवटचा दिवस होता.. ८ जून पासून मृग नक्षत्र सुरू
झाले आहे. भात पेरणीसाठी शेतकरी भाषेत धुळवाफेत रोहिणी नक्षत्राची. वाफ लागल्यास त्या वर्षात धनधान्य मुबलक प्रमाणात होते, असे बळीराजाचा अंदाज असतो. यंदा रोहिणी नक्षत्रात एक दोन वेळा झालेला पाऊस वगळता या भागात फारसा पाऊस झालेला नाही. मात्र पावासाची वाट न पाहता रोहिणी नक्षत्राचा मुहूर्त साधण्यासाठी आंबेगाव तालुक्यात धूळवाफेवर भात पेरणी करण्यास सुरूवात केली आहे.. .
रोहिणी नक्षत्रावर भात पेरणी झाल्यास भात वाफ़े तयार होतात. धुळवाफेवर भात पेरणी करणे म्हणजे कोरडया भात वाफ्यात बी पेरणे 'याला आहे.
भात पेरणी असे म्हटले जाते. भात हे आंबेगाव तालुक्यातील . आदिवासी बांधवांच प्रमुख पीक आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह या पिकावर अवलंबून असतो. मागील काही वर्षांपासून . पावसाळ्याच्या सुरूवाती... पासूनच पावसाच्या लहरीपणाचा शेतकऱ्यांना अंदाज आला आहे. दोन तीन वर्षांपासून पावसाळा सुरू होण्याचा कालावधी वाढला आहे. दरवर्षी १५ जुनपासून सुरू होणारा पाऊस आता जुलैच्या मध्यानंतर सुरू होत..- असल्याचे पहावयास मिळत तोय .
प्रतिनिधी - आकाश भालेराव
आंबेगाव