पेठ घाट चाडल्या चडल्या वनविभगा च्या ऑफिस जवळ एक चुकीचा गतिरोधक टाकण्यात आलेला आहे , परंतु हा गतिरोधक च अपघाता साठी मोठे कारण ठरण्याची दाट शक्यता आहे , या धकावर कुठल्याही प्रकार ची लाईन बनवण्यात आलेल्या नाही , त्या मुळे तिथून जाणाऱ्या गाडी चालकांना गतिरोधक लगेच दिसून येत नसल्या मुळे गाडी त्या गतिरोध का वर खूप जोरात आळली जाते त्या मध्ये गाडी चे मोठे नुकसान होण्याची दाट शक्यता असून , या गतिरोधका च्या आधी मोठ्या प्रमाणात चढण असल्या मुळे गाड्या या प्रेशर वर आसतात व सपाटी लागताच सर्व गाड्या वेग घेतात आणि अचानक हा गतिरोधक न दिसल्या मुळे त्या वर खूप जोरात त्या वर आपटल्या जात आहेत ,ज्या लोकांना अचानक गतिरोधक दिसल्या मुळे ते गाडीला जाग्यावर ब्रेक मारून गाडी कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु पुडची गाडी अचानक स्पीड मध्ये ब्रेक मारत असल्या मुळे मागून येणारी गाडी त्या गाडी वर धडकण्याची दाट शक्यता आहे , येणाऱ्या जाणाऱ्या मोटासायकलस्वार यांना तो गतिरोधक न दिसल्या मुळे त्या वरून पडण्याची आणि अपघात होण्याची अधिक शक्यता आहे , परंतु हा गतिरोधक त्या ठिकाणी का टाकला ? टाकला तर त्या वर लाईन का नाही बनवल्या नाहीत ? या गतिरोध का मुळे किती अपघात घडू शकतात याची थोडी देखील परवा न करता हा चुकीचा गतिरोधक या ठिकाणी टाकण्यात आला आहे, की जो कोणत्याही क्षणी अपघातास कारणीभूत ठरून लोकांचा जीव घेऊ शकतो , हा गतिरोध त्वरित त्या ठिकाणावरून हलवला नाही तर ते ठिकाणी कोणते ही कारण नसताना अपघाताचे मोठे ठिकाण बनू शकते, संबंधित विभागा ने तो गतिरोधक त्वरित त्या ठिकाणावरून काढून टाकावा अन्यथा तिथे होणाऱ्या प्रत्येक अपघातास ते स्वतः जबदार असतील .
प्रतिनिधी - आकाश भालेराव
पेठ