Type Here to Get Search Results !

डोंबिवली वाहतूक विभागा कडून फ्लॅश डिप्लॉयमेंट कारवाईला सुरवात.



 मा. पोलीस उपायुक्त वाहतूक शाखा ठाणे शहर माननीय डॉक्टर श्री विनय कुमार राठोड यांच्या संकल्पनेतून ठाणे शहरात एखाद्या महत्त्वाच्या चौकामध्ये जास्तीत जास्त वाहतूक पोलीस अधिकारी, अंमलदार नेमून वाहतूक नियमांची अंमलबजावणी व जनजागृती करण्यासाठी *फ्लॅश डिप्लॉयमेंट* ही कारवाई करण्यात येत आहे.




त्या अंतर्गत टिळक चौक, डोंबिवली पूर्व या ठिकाणी आज दिनांक 14/ 5 /2023 रोजी सकाळी 11.00  ते 12.00 वा. चे दरम्यान मा.श्री मंदार धर्माधिकारी, सहाय्यक पोलीस आयुक्त, कल्याण वाहतूक विभाग यांचे उपस्थितीत *फ्लॅश डिप्लॉयमेंट* करून  मोटार वाहन कायदा अंतर्गत विविध कलमान्वये कारवाई करण्यात आली .





      यामध्ये विदाऊट हेल्मेट  -72 , विदाऊट सीट बेल्ट 21, जम्पिंग सिग्नल 10,ब्लॅक फिल्म 01,  ट्रिपल सीट 13,  फ्रंट सीट15 , विदाऊट लायसन 05,  बुलेट सायलेन्सर 01, गणवेश न घालने 20 व इतर 57 अशा *एकूण 215*  कसूरदार वाहन चालकावर कारवाई करून 1,62,200/- इतका दंड आकारण्यात आला असुन त्या पैकी *23,800/-₹  दंड जागीच वसूल* करण्यात आला आहे.




 या कारवाई मध्ये डोंबिवली विभागाचे 01 अधिकारी, 10 पोलीस अंमलदार व 08 वॉर्डन तसेच कोळशेवाडी उपविभागाचे 03 अंमलदार,01 वॉर्डन व कल्याण उप विभागाचे 02 पोलीस अंमलदार,01वॉर्डन असे *एकूण 01 अधिकारी, 15 अमलदार, 10 वॉर्डन* सहभागी होते.




   यादरम्यान विशिष्ट वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांनी मोटार वाहन नियमांचे पालन करण्याची माहिती देणारे फलक दाखवून जनजागृती सुद्धा केली आहे. डोंबिवली वाहतूक शाखेकडून सर्व डोंबिवलीकर नागरिकांना या माध्यमातून वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात येत असून यापूढे सुद्धा वाहतूक विभागाकडून ही करवाई अशीच चालू राहणार आहे.अशी माहिती पोलीस उप निरीक्षक वाहतूक विभाग उमेश यांच्या कडून कळवण्यात आले . 




प्रतिनिधी / भानुदास गायकवाड

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad