धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या अंगावर डंपर घालून चिरडण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ओमराजे हे शुक्रवारी सकाळी मॉर्निंग वॉकला गेले होते. त्यावेळी रस्त्याच्याकडेने जात असताना त्यांच्या पाठीमागून एक भरधाव डंपर त्यांच्या दिशेने येत होता. त्यावेळी ओमराजेंनी तत्काळ रस्त्याच्याकडेला उडीमारून आपला जीव वाचवला. त्यानंतर त्यांनी एका दुचाकीस्वाराच्या मदतीने डंपर अडवला आणि ढोकी पोलिसांत तक्रार दिली. यामागे घातपाताची शक्यता असल्याची चर्चा आहे.