"कल्याण डोंबिबली मध्ये शिवसेना भाजप गटात अंतर्गत धुसपूस "
कल्याण डोंबिवली मध्ये शिवसेनेची युति असुन् भाजप युती अंतर्गत बरीच कामे प्रगती पथावर आहेत व बरीच चांगली कामे झाली आहेत,
पण मागील काही दिवसामधे या दोन्ही गटात अंतर्गत वाद चालु असल्याचे दिसून आले ,एका भाजपा नेत्यावर लावलेल्या विनयभंगाचा खोटा गुन्हा एका वरिष्ट पोलीस निरीक्षकांनी कुठलीही चौकशी न करता दाखल केला असा आरोप मागील दिवसात भाजपा कडून करण्यात आला होता, त्यांचं निलंबन व्हावे असे भाजपा कडून मोर्चा काडून निषेध करण्यात आला होता , त्या नंतर त्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला रजेवर जाण्याचे आदेश देण्यात आले होते,
दोन दिवसापूर्वी दिवा येथे झालेल्या आग्री कोळी भवनांच्या भूमी पूजनाचे बॅनर शिवसेने कडून लावले गेले होते त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो नसल्याचे आढळून आले होते , यात भाजपा व शिवसेनेत नाराजी चे स्वर उमटले होते,
या प्रश्नावर जेव्हा पत्रकारांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना विचारलं असता देवेंद्र फडणवीस साहेबाना फोटोची गरज नाही , त्यांचं "नाम ही काफी है" अस त्यांच्या कडून बोलण्यात आले,
आज खाजदार श्रीकांत शिंदे यांच्या कडून ही 2024 ची निवडणूक आपल्याला जिंकायची आहे ,चांगल्या चालेल्या कामात कोणी मिठाचा खडा टाकू नये तसेच यात कोणी ही स्वार्थ आणू नये , माजा ही यात काही स्वार्थ् नाही टाईम पडला तर मीही खासदारकीचा राजीनामा देईन व त्या जागी तुमी तुमचा उमेदवार उभा करू शकता पण मी युतीला घेऊनच चालणार,
छोट्याश्या गोष्टीला म्हणजे एका सिनिअर पी आई ला निलंबित करत नाही तो पर्यंत सेनेला सपोर्ट करायचं नाही लोकसभा निवडणुकीत सेनेला उमेदवारी द्यायचा नाही या भाजपा च्या आव्हानाला श्रीकांत शिंदे यांनी पूर्ण विराम देण्याचा प्रयत्ना केला .
डोंबिवली / भानुदास गायकवाड़