सोलापूर ते पुणे शिवशाही बसने प्रवास करत असताना टेंभुर्णीवरून पुण्याकडे जाताना शीतपेयामधून गुंगीचे औषध देऊन अज्ञात इसमाने सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास केला आहे. शिवराज संतोष वरपे (रा. निमगाव टे) हे शिवशाही बसने प्रवास करत होते. भिगवन (ता. इंदापूर) येथील हॉटेलवर गाडी थांबली असता शीतपेयामधून गुंगीचे औषध देऊन त्यांची दोड ग्रॅमची व पाच तोळ्याची चेन, अर्ध्या तोळ्याच्या दोन अंगठ्या, साठ हजारांचा मोबाइल असा एकूण तीन लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.