Type Here to Get Search Results !

इंदापूर | संत तुकाराम महाराज पालखी रिंगण सोहळ्याच्या जागेत बदल



श्री संत तुकाराम महाराज यांचे सोलापूर जिल्ह्यातील पहिले उभे रिंगण माळीनगर येथे रविवार दि. २५ जून होणार आहे. पूर्वीपासून जेथे उभे रिंगण होत होते, तेथे उड्डाणपुलाचे काम चालू असल्यामुळे उभे रिंगन सोहळाचे ठिकाण बदल करण्यात आले आहे. पुलाच्या अलीकडे उभे रिंगण घेण्यात येणार आहे, अशी माहिती संत तुकाराम महाराज पालखी सोहळाप्रमुख संजय महाराज मोरे यांनी दिली.

संत तुकाराम महाराज पालखी मार्ग राष्ट्रीय मार्ग ९६५ जी हा १३० किलोमीटर लांबीचा महामार्ग पुणे जिल्ह्यातील पाटस, बारामती, इंदापूर - सोलापूर जिल्ह्यातील अकलूज माळीनगर, तोंडलोपर्यंत विकसित करण्यात येत आहे. या पालखी मार्गाच्या रुंदीकरणाचे काम धीम्या गतीने सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad