एकेकाळी ऑर्केस्ट्रामध्ये नृत्यांगना म्हणून काम करणारी गौतमी पाटिलने आज सर्वांना मागे टाकून पुढे गेली आहे एखाद्या अभिनेत्रीलाही नसेल अशी गौतमी पाटीलचा चाहता सध्या महाराष्ट्रभर निर्माण झाला आहे. त्यामुळेच तिच्या कार्यक्रमांना संपूर्ण महाराष्ट्रातून मागणी येत आहे. कारण गौतमी चा कार्यक्रम यशस्वी होतोचं हे समीकरण झालं. गौतमी पाटीलचा जिथे कार्यक्रम असतो त्या कार्प्रयक्रमाला मोठ्या प्रमाणात गर्दी पहायला मिळत असते. काही वेळा तर तिच्या कार्यक्रमात प्रेक्षकांना आवर घालण्यासाठी पोलिसांनां चाहत्यावर लाठी चार्ज हि करावा लागतो. यावरून गौतमीची क्रेझ किती मोठ्या प्रमाणात आहे हे दिसून येते.
सुरुवातीच्या काळात गौतमीच्या कार्यक्रमातील तिच्या डान्सच्या टेप्स वर आक्षेप ही घेतला होता. गौतमी अश्लील अदा करते अशी टीका गौतमी पाटील वर झाली त्यावेळी तिने स्वत:हून चाहत्यांची माफीही मागितली. त्यानंतर तिने अश्लील हावभाव वाटणाऱ्या स्टेप्स करणं टाळल्या. तरीही तिच्या कार्यक्रमांना होणारी गर्दी काही थांबताना दिसत नाही.
गौतमी सध्या एका कार्यक्रमा साठी १.५ ते २ लाख रुपये मानधन घेत असते. तिचा १० ते १२ जणांचा ग्रुप आहे. या सर्वांमध्ये मानधन वाटल्या नंतरही गौतमी पाटील महिन्याला 30 ते 35 लाख रुपये सहज कमावते. एखाद्या सिनेमात काम करणाऱ्या नटीला तोडीस तोड गौतमीची कमाई आपल्याला पहावयास मिळते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गौतमीच्या कार्यक्रमांना ग्रामीण भागातून अधिक मागणी राहते. त्यातही तिने कोल्हापूर आणि पुण्यात सर्वाधिक कार्यक्रम केले. गौतमी पाटील खानदेशातील असूनही तीचा पुणे आणि कोल्हापुरात चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे हे विशेष पहायला मिळते.
'गौतमीचं' खरं आडनाव पाटील नाही तीचे खरे आडनाव 'चाबुकस्वार' हे आहे.पाटील आडनाव लावून ती पाटलांची बदनामी करते गौतमीनं पाटील हे आडनाव लावू नये. अन्यथा महाराष्ट्रात तिचे कार्यक्रम होऊ देणार नाही असा इशारा मराठा समन्वयकचे राजेंद्र जराड पाटील यांनी यावेळी दिला आहे. त्यामुळे गौतमीच्या आडनावावरून नवा वाद निर्माण झाल्याचे चित्र हि आपल्याला पहावयास मिळते.