Type Here to Get Search Results !

दशरथ माने यांनी दुधाचे दर पाडले - राहुल बिडवे



महाराष्ट्रामध्ये शेतीला जोडधंदा हा दूध व्यवसाय म्हणून पाहिले जाते शेतकऱ्यांची तरुण मुले हा व्यवसाय मोठ्या चिकाटीने करतात सध्या उन्हाळा चालू असून दूध पुरवठा कमी आहे या काळात दुधाचे भाव वाढले पाहिजे होते मात्र तसे न होता गेली दहा दिवसांमध्ये दुधाचे भाव तब्बल तीन रुपयांनी कमी करण्यात आले यामागे सोनाई चे दशरथ माने यांचाच हात आहे त्यांनीच जाणीवपूर्वक दुधाचे भाव पाडून शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे पाप करत आहेत असा स्पष्ट आरोप रयत क्रांती संघटनेचे राहुल बिडवे यांनी केला.


कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या दुधाला ३७ रुपये दर आणि दोन रुपये बोनस सोलापूर पुणे उस्मानाबाद जिल्ह्यात मात्र ३४ रुपये दर बोनस कधीच देत नाहीत. हँटसन शेजारील राज्यातील दूध संघ महाराष्ट्रात येऊन २.५० जास्त दर देतो त्यांना परवडते मग राज्यातील या पांढर पेशी लोकांना का परवडत नाही ज्यांना परवडत नाही त्यांनी आपले दूध संघ बंद ठेवावेत विनाकारण शेतकऱ्यांना लुटायचा धंदा करू नये एक रुपयांनी दुधाचे दर वाढले की शंभर रुपये पशुखाद्य वाढवतात दोनशे ते चारशे रुपयांनी ओला व सुका चारा वाढवतात तेच दूध कमी आला की त्याचा भाव कमी होत नाही तो मात्र तसाच राहतो यामुळे शेतकऱ्याचे पूर्ण बजेट कोलमडते आणि हे जर असेच चालू राहिले तर शेतकऱ्यांची तरुण मुले दूध व्यवसाय बंद करतील राज्यात ठीक ठिकाणी भेसळ माफिया वाढत आहेत या दूध संघातील अधिकारी यांना हप्ते मिळत असल्यामुळे ते पण याकडे डोळे झाक करतात सरकारला याचे सोयर सुतक नाही अन्नभेसळ प्रशासनाला वेळेवर सर्व मलिदा पोच होतो म्हणून काबाडकष्ट करणाऱ्या गावगाड्यातील शेतकऱ्यांचे तुम्ही रक्त शोषण करणार असाल तर रस्त्यावर उतरून लढाईची तयारी आहे प्रसंगी रक्त सांडावे लागेल.


माजी मंत्री सदाभाऊ खोत...

राज्यात दुधाचे उत्पादन कमी झाले आहे यावेळी शेतकऱ्यांना चार पैसे जादा मिळाले पाहिजे दुसऱ्या बाजूला दुधातील भेसळखोरांना लगाम लावणे गरजेचे आहे व प्रत्येक दुधसंघावर सरकारने दुध तपासणीकरता प्रशासक नेमणे गरजेचे आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad