बैलगाडा शर्यतीचा कायदेशीर मार्ग मोकळा..
राज्यातील बैलगाडा शर्यतींच्या परवानगीबाबत आज सुप्रीम कोर्टाने निकाल जाहीर केला. त्यामध्ये न्यायलायने महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यत कायदा वैध ठरवला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाने बैलगाडा शर्यत प्रेमींसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे. हा निकाल देत असताना विधिमंडळाने केलेल्या कायद्यात हस्तक्षेप करणार नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. या शर्यतींच्या माध्यमातून ग्रामीण भागात मोठी आर्थिक उलाढाल होत असते. त्यामुळे बैलगाडा प्रेमींनी आनंद व्यक्त केला.