ईडीने जयंत पाटील यांची आज तब्बल ९ तास कसून चौकशी केली. चौकशी संपल्यानंतर रात्री ९:३० वाजण्याच्या सुमारास जयंत पाटील ईडीच्या कार्यालयातून बाहेर पडले. दरम्यान, कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी पाटलांची ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. आज ईडी कार्यालयाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी केली होती. चौकशी झाल्यानंतर, कार्यालयातून बाहेर आल्यावर, पाटलांच्या चेहऱ्यावर कुठलाही तणाव दिसला नाही. उलट ते हसतमुख चेहऱ्यानं बाहेर आले.