गौतमी पाटीलचे कार्यक्रम आणि त्यात होणारी हुल्लडबाजी, राडा हे आता हे समीकरणच काय नवे राहिलेले नाही. विठ्ठल घोडके - रूपाली घोडके तासगावमधील या जोडप्याचा लग्नाचा 25 वा वाढदिवस होता. यामुळे त्यांनी गौतमी पाटीलचा कार्यक्रम ठेवला होता.
कार्यक्रम शांततेत पार पडावा यासाठी तगडा पोलिस बंदोबस्त व खासगी सुरक्षा रक्षकांचा फौजफाटा मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला होता. काही प्रेक्षकांनी हुल्लडबाजी करण्यास सुरूवात केली. पोलिसांनी आपला पोलिसी खाक्या दाखवत हुल्लडबाजांवर पोलिसांना केली लाठ्यांची बरसात.