तब्बल ४० वर्षांनी चिंचोली (कोकणे) येथे माजी विद्यार्थी संघ मित्र परिवार आयोजित 'स्नेह मेळावा व सन्मान गुरुजनांचा' विद्यालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच तो ही अतिउत्साहात संपन्न.
चिंचोली (कोकणे) : श्री कपालेश्वर एज्युकेशन सोसायटी संचालित *जगदीशचंद्र महिंद्रा हायस्कुल*, चिंचोली (कोकणे), ता आंबेगाव जि पुणे (महाराष्ट्र)च्या *माजी विद्यार्थी संघ* मित्र परिवाराच्या वतीने *✍️"माजी विद्यार्थी स्नेह मेळावा व सन्मान गुरुजनांचा"✍️* रविवार, दि.३० एप्रिल, २३ रोजी दुपारी ०२ ते ०५.३० यावेळेत अती उत्साहात संपन्न झाला आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे हा मेळावा *विद्यालयाच्या इतिहासात 👉पहिल्यांदाच👈 तो ही ४० वर्षानंतर ऐत्याहासिक असा प्रथमतःच* आनंदाने पार पडला आहे.
यावेळी सर्व आलेल्या सन १९८३ ते २०२३ दरम्यानच्या माजी विद्यार्थी सह गुरुवर्यांचे स्वागत संघाच्या वतीने गुलाब पुष्प देऊन करण्यात आले मेळाव्याप्रसंगी सर्व आजी-माजी शिक्षकांचा तसेच शिक्षकेत्तर वृंद यांचा सत्कार फेटा बांधून व सन्माचिन्ह देऊन करण्यात आला त्यानंतर अनेक माजी विद्यार्थी सह मान्यवर पाहुण्यांनी मनोगत व्यक्त केले शेवटी प्रातनिधिक स्वरूपात ज्येष्ठ शिक्षकांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि विद्यालयाप्रती आप-आपल्या भावना व्यक्त केल्या. यादरम्यान सेल्फी पॉइंट, जुने छायाचित्रे, आठवणी, कविता, ओव्या, बॅच नुसार बैठक व्यवस्था इत्यादी प्रदर्शित करण्यात आले होते. पुन्हा एकदा आपली शाळा भरलेला प्रत्यय आल्याची भावना सर्वत्र होती आणि सर्व प्रेमाने एकमेकांना आलिंगन देऊन आनंद व्यक्त करीत होते.
वरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद (सर) कोकणे यांनी करून प्रास्ताविक बबनराव कोकणे यांनी मानले.
प्रतिनिधी - आकाश भालेराव
चिंचोली