बार्शी शहर पोलीसाची मोठी कारवाई बार्शी शहर पोलीस ठाणे हद्दीत बार्शी लातूर रोडला एमआयटी कॉलेजच्या जवळ मालवाहतूक ट्रक मधून ६३ लाख ७० हजाराचा गुटखा व मालवाहतूक ट्रक ताब्यात घेतला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ एप्रिल रोजी रात्री गोपनिय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, बार्शी शहर पोलीस ठाणे हददीमध्ये बार्शी लातूर रोडला, एम आय टी कॉलेजच्या जवळ, रस्त्याचे कडेला, अंधारात एक गुटख्याची पोती भरलेला ट्रक उभा आहे. अशी बातमी मिळाल्याने लागलीस सदर बातमीच्या अनुषंगाने एक पथक तयार करुन सदर ठिकाणी रवाना केले. सदर ठिकाणी जाउन पाहणी केली असता एम आय टी कॉलेजच्या जवळ, रस्त्याचे कडेला, अंधारात के ए ५६ ०१४४ असा आर टी ओ पासिंग असलेला एक ट्रक उभा होता. सदर ट्रकच्या जवळ जाऊन पाहीले असता त्यामध्ये दोन इसम बसलेले होते.