शरद पवारांचा निर्णय न पटणारा!
शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्ष पदावरून पाय उतार होण्याचे संकेत देताच राजकारण ढवळून निघाले आहे. शरद पवारांच्या निर्णयावर विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहे. काँग्रेसचे अशोक चव्हाणांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. 'सध्या राज्यात चाललेलं राजकारण बघता शरद पवारांनी निवृत्तीची घोषणा करणं, हे कुठेतरी खटकते. केंद्र पातळीवर सर्व पक्ष एकत्र येऊन भाजपविरोधात मोठी फळी तयार करत असताना पवारांचा असा निर्णय न पटणारा असल्याचे मत अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केले.