सुप्रिया तू काहीही बोलू नको ...!
आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर अजित पवारांनी त्यांच्या या विचाराचे समर्थन केले. मात्र कार्यकर्ते शरद पवारांच्या हा निर्णय मागे घेण्याच्या भूमिकेवर ठाम होते. त्यामुळे त्यांनी सुप्रिया सुळे यांना साहेबांना बोलण्याची विनंती केली असता, अजित पवार यांनी सुप्रिया तू काहीही बोलू नको, मोठा भाऊ या नात्याने तुला सांगतो असे म्हणत सुप्रिया सुळेंना बोलण्यापासून रोखले.