फेरविचारासाठी शरद पवारांनी मागितला वेळ
शरद पवारांनी राजकारणातून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भावूक झालेत. या निर्णयानंतर शरद पवारांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक बाहेर कार्यकर्ते येऊ लागले आहेत. राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांच्या बैठकीनंतर अजित पवारांनी शरद पवारांचा निरोप दिला आहे. 'आम्ही नेत्यांनी मिळून साहेबांशी चर्चा केली आहे. ते म्हणाले, माझा निरोप द्या. तुमच्या आग्रहाखातर मला विचार करायला दोन ते तीन दिवस द्या.' असे पवारांनी बोलल्याचे अजित पवारांनी सांगितले.