शरद पवारांच्या निर्णयावर फडणवीसांची प्रतिक्रिया
शरद पवारांच्या निर्णयाचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटायला सुरुवात झाली आहे. दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पवारांच्या निर्णयानंतर प्रतिक्रिया दिली आहे. 'पवार साहेबांचा निर्णय हा राष्ट्रवादीचा अंतर्गत बाब असून तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. शरद पवार हे ज्येष्ठ नेते असून त्यांनी काहीतरी ठरवले आहे, त्यांच्या पक्षात अनेक मुद्द्यांवर विचारमंथन सुरू आहे, त्यामुळे यावर प्रतिक्रिया देणे योग्य ठरणार नाही.' अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी या वेळी दिली आहे