राज्यस्तरीय 23 वर्षातील टेनिस क्रिकेट स्पर्धेत रत्नागिरी जिल्हा द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला.
टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र आणि टेनिस क्रिकेट असोसिएशन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानाने नाशिक येथील तालुका क्रीडा संकुल सय्यद पिंपरी येथे 23 वर्षातील महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धा मुल-मुली दिनांक 24 ते 27 एप्रिल 2023 रोजी संपन्न झाली. स्पर्धेमध्ये रत्नागिरी जिल्ह्याच्या संघाने सहभाग घेतला होता. सहभाग घेऊन उत्कृष्ट कामगिरी करत अंतिम सामन्यापर्यंत मजल मारली आणि अंतिम सामना हा रत्नागिरी विरुद्ध बीड यांच्यात झाला या सामन्यामध्ये बीड संघाचा विजय झाला आणि रत्नागिरी संघ दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याच्या संघामधून कर्णधार अनिकेत चंद्रकांत गावणकर , प्रथमेश चंद्रकांत जानसकर ,पीयूष जगदीश पवार ,संचित देऊ मोहिते, रोहन गंगाराम धनावडे ,राहुल दिनेश गावणकर, ऋषिकेश सुनील इंदुलकर, स्वरूप प्रकाश पांचाळ, अनिकेत प्रकाश गुरव, प्रतीक प्रकाश पळसमकर, गणेश सुरेश वीर ,मेघराज मनोहर पेजे, वेदांत संजय निवाते, कुणाल नामदेव हळदणकर, सुमित रवींद्र आणेराव, संकेत संजय मांडवकर यांनी उत्कृष्ट खेळी केली. त्याचप्रमाणे पहिल्या साखळी सामन्यात संकेत संजय मांडवकर, दुसऱ्या साखळी सामन्यात राहुल दिनेश गावणकर, उपांत्यपूर्व फेरी मध्ये कुणाल नामदेव हळदणकर उपांत्य फेरीत संकेत संजय मांडवकर यांना सामनावीर म्हणून सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे सर्वोत्कृष्ट फलंदाज संकेत संजय मांडवकर आणि मालिकावीर राहुल दिनेश गावणकर यांना चषक देऊन सन्मानित करण्यात आले. रत्नागिरी जिल्हा सचिव सिद्धेश गुरव, टीम कोच रोशन किरडकर, टीम मॅनेजर सुरज गुरव यांनी रत्नागिरी जिल्ह्याच्या संघाला उत्तम मार्गदर्शन दिले.
या स्पर्धेसाठी प्रमुख उपस्थिती म्हणून महाराष्ट्र राज्य सचिव मीनाक्षी गिरी, अप्पर विभागीय आयुक्त नाशिक श्री काटकर साहेब, नाशिक जिल्हाक्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, वुमन डायरेक्टर धनश्री गिरी, टेक्निकल डायरेक्टर स्वप्निल ठोंबरे, यांनी उपस्थित राहून सर्व खेळाडूंना मार्गदर्शन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
तसेच रत्नागिरी जिल्ह्यातुन सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले जात आहे. यामध्ये माझे कोकणचे पत्रकार राहुल वरदे सर, क्रिकेट प्रेमी मधुकर जाधव, वनगुळे गावचे सरपंच प्रभाकर गुरव, अशोक गुरव, दिलीप दिवाळे गुरुजी, महादेव खानविलकर, सुरेश भालेकर, गणेश खानविलकर, महेश वीर, प्रणव खानविलकर, अजय मोर्ये, अमेय खानविलकर यांनी सर्व खेळाडू अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.