Type Here to Get Search Results !

माढा | सापटणे चोरट्याने मारला १ लाख २८ हजारच्या दागिनेवर डाला



सापडणे येथे चोरट्याने मारला दागिन्यावर डल्ला


माढा तालुक्यात सापटने (टें) येथे उघड्या असलेल्या घरात प्रवेश करून चोरट्यांनी दागिन्यांसह रोख रक्कम तीन हजार असा एकूण एक लाख २८ हजार रुपयांच्या दागिन्यांवर डल्ला मारला. याबाबत संग्राम बाळासाहेब रणदिवे (वय २३, रा. सापटने टें) यांनी फिर्याद दिली आहे. उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे. उकाड्याने हैराण झाल्याने रणदिवे यांचे कुटुंब घर उघडे ठेवून झोपी गेले. ही संधी साधून चोरटे घरात शिरले. ८० हजार रुपयांचे दोन तोळ्याचे सोन्याचे गंठन, ४० हजारांच्या अर्धा तोळ्यांचे दोन अंगठ्या, पाच हजारांचे पैंजणजोड, एक छल्ला,करंडा व बिचवा तसेच तीन हजार रुपये रोख रक्कम असा मौल्यवान ऐवज चोरून नेला आहे. याबाबत टेंभुर्णी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास हेड कॉन्स्टेबल शिवाजी भोसले करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad