आज फैसला..! शिंदे सरकार राहणार की कोसळणार?
महाराष्ट्रातील बहुचर्चित सत्तासंघर्षावर आज ११ वाजता सर्वोच्च न्यायालय आपला निकाल देणार आहे. या महत्त्वाच्या निकालानंतरच महाराष्ट्राच्या राजकारणाची पुढील दिशा ठरणार आहे. या निकालाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाची धाकधूक वाढली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाकडून दिला जाणारा निकाल शिंदे सरकारचे भवितव्य ठरवणार आहे. यामध्ये १६ आमदारांना अपात्र ठरवल्यास भाजपच्या
पाठिंब्याने सत्तेत आलेले हे सरकार कोसळ शकते.