निकालापूर्वीच राष्ट्रवादीला झटका, ईडीची नोटीस धाडली
राज्याच्या सत्तासंघर्षाचा निकाल आज लागणार असतानाच आज महाविकास आघाडीचे नेते आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीने नोटीस बजावली आहे. पाटील यांना IL&FS प्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली असून त्यांना सोमवारी चौकशीसाठी हजर राहायला सांगण्यात आले आहे. सत्ता संघर्षाचा निकाल येण्याआधीच ही नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे कुठेतरी राष्ट्रवादीवर दबाव टाकण्यासाठी हा प्रकार सुरु असल्याची चर्चा राजकीय वर्तळात सरु आहे.