Type Here to Get Search Results !

नाशिक जिल्हा अँथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा उत्साहात संपन्न.



नाशिक जिल्हा अँथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा उत्साहात संपन्न.


   नाशिक गुरूवार दि.११ मे अँथलेटिक्स हा खेळ सर्व खेळांचा पाया आहे. नाशिकच्या मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुलच्या सिंथेटिक्स ट्रॅकवर वरिष्ठ गटाच्या पुरुष आणि महीलां साठी नाशिक जिल्हा अजिंक्यपद अँथलेटिक्स स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेची यशस्वी सांगता झाली. या स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातील २८० खेळाडूंनी सहभाग  घेतला. सकाळी ७. ०० वाजता स्पर्धेत सुरवात झाली. 




यामध्ये १०० मीटर धावणे शर्यतीत यशवंत गुंजाळने हे रेस ११. २० सेकंदात पूर्ण करून सुवर्ण पदक मिळविले, अजय पाथरेने दुसरा आणि खंडेराव जाधवने तिसरा क्रमांक मिळविला. २०० मीटर धावणे शर्यतीत अजय पाथरे ने ही रेस सर्वात कमी २२.२० सेकंदात पूर्ण करून सुवर्णपदक पटकावले.




तर ३००० मीटर स्टीपल चेस प्रकारात शुभम भंडारेने ही रेस सर्वात आधी ८. ५३. ४० मिनिटात पूर्ण करून सुवर्ण पदक मिळविले. पुरुषांच्या ८०० मीटर धावणे शर्यतीत विष्णू बिसोनी ने हे अंतर १. ५६. ७० मिनिटात पूर्ण करून सुवर्णपदक जिंकले.




२०० मीटर धावणे शर्यतीत अजय पाथरेने पहिला , महक दीपसिंगने दुसरा तर तेज सपाळे ने तिसरा क्रमांक मिळविला. महिलांमध्ये ८०० मीटर धावणे प्रकारात आंतरराष्ट्रीय खेळाडू ताई बामणे हिने हे रेस २.०९. ८० मिनिटामध्ये हे अंतर पूर्ण करून सुवर्णपदक मिळविले. तर तिची सहकारी यमुना लडकतने दुसरा क्रमांक मिळविला.




महिलांच्या २०० मीटर धावणे प्रकारात साक्षी झोरेने पाहिला तर उमा महाले हिने दुसरा क्रमांक मिळविला. विजेत्या खेळाडूंना प्रमुख अथितीच्या हस्ते पदक आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेतील कांगारीच्या आधारे आणि राज्य असोसिएशनच्या नियमाप्रमाणे जे खेळाडू पात्र ठरले आहेत त्यांची निवड नाशिक जिल्हा संघामध्ये करण्यात येणार आहे. हे खेळाडू दिनांक पुणे येथे आयोजित महाराष्ट्र राज्य स्पर्धेत नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करतील अशी माहिती नाशिक जिल्हा ऍथलेटिकस असोसिएशनचे अध्यक्ष हेमंत पांडे आणि सचिव सुनील तावरगिरी यांनी दिली. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्व प्रशिक्षक, वरिष्ठ खेळाडू आणि सहकारी यांनी मोलाचे सहकार्य केले. 




 स्पर्धेचे निकाल :-  पुरुष 

१०० मीटर धावणे - १)यशवंत गुंजाळ २) अजय पाथरे ३) खंडेराव जाधव   

२०० मिटर रन - १) अजय पाथरे २) मोहक दिपसिंग ३) तेज सपाळे     ८०० मिटर रन - १)विष्णू बीसींनी २)तुषार सूर्यवंशी ३)हर्षद बच्छाव 

३००० मीटर स्टीपल चेस - १) शुभम भंडारे २) सिकंदर ताबके ३) कार्तिक कुमार   लांब उडी - १) पाऊजा चौधरी थाळी फेक - १) सतीश देशमुख 

 

महिला

१०० मीटर धावणे -१)साक्षी झोरे २)त्रिशा नायर ३) शुभांगी शामकर   २०० मिटर रन - १) साक्षी झोरे २)उमा महाले     ८०० मिटर रन - १)ताई बामणे २)यमुना लडकत  ४०० मीटर हर्डल्स - १) श्रावणी सांगळे लांब उडी - १) नीलिमा महाले गोळा फेक - १) हेमांगी पंडित थाळी फेक - १) अंतरा शहा २) स्नेहा अंचल  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad