महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 9 मार्च 2007 ला बिहारी, उत्तर भारतीय लोकांविरोधात केलेल्या कथित अपमानास्पद वक्तव्याप्रकरणी बिनशर्त माफी मागितली आहे. न्यायालयाने त्यांचा माफीनामा स्वीकार केला आहे. जमशेदपूरचे वकील सुधीर कुमार पप्पू यांनी 2007 साली राज ठाकरेंविरोधात तक्रार दाखल केली होती. गेल्या 16 वर्षांपासून हे प्रकरण न्यायालयीन प्रक्रियेत होते. अखेर राज ठाकरेंनी न्यायालयात आपला माफीनामा सादर केला आहे