महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. या निकालावर माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी खळबळजनक प्रतिक्रिया दिली आहे. मी काही कायद्याचा जाणकार नाही. मात्र त्यावेळी जे पाऊल उचलले ते विचारपूर्वकच होते. आता जे झालं ते झाले. तसेच मी उद्धव ठाकरे यांना राजीनामा देऊ नका, असे सांगितले होते तरी सुद्धा त्यांनी राजीनामा दिला, असल्याचा खळबळजनक दावा कोश्यारी यांनी केला आहे.