गौतमी पाटीलसाठी मागितली सुट्टी
प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटीलचे पूर्ण महाराष्ट्रभर लाखो चाहते आहेत. चिमुरड्यांपासून ते आबालवृध्दांपर्यंत सर्वजण तिच्या नृत्याचे 'जबरा फॅन' आहेत. गावाकडे जत्रा-यात्रांमध्ये मनोरंजन / करमणूक कार्यक्रमांसाठी गौतमीला मागणी असते. गावात गौतमी पाटील येणार असल्याने तासगाव आगारातील एसटी कर्मचाऱ्याने दोन दिवसांच्या रजेसाठी अर्ज केला आहे. सोशल मिडियावर हा रजेचा अर्ज व्हायरल झाला आहे.