ललिता महादेव गावडे वय वर्षे 45 रा घाटकोपर मुंबई दिनांक 13/05/2023 रोजी सकाळी 11:45 वाजण्याच्या सुमारास चालू एस टी मध्ये ललिता महादेव गावडे यांच्या बॅग मधून कोणी तरी अज्ञात चोरट्या ने दागिने चोरून नेल्याची घटना मंचर एस टी स्टँड परिसरात घडलेली आहे या चोरी मध्ये ललिता महादेव गावडे यांचे 1) 30 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी मंगळ सूत्र जु.वा.कि.अं. 120,000/- रुपये
2) 7 ग्रॅम वजनाचे सोन्याचे झुमके जु. वा . कि. अं. 28,000/- रुपये
3) 3 ग्रॅम वजनाचे सोन्याचे झूमके जु. वा. कि. अं . 12000/- एकूण 160,000 चे दागिने चोरीला गेले असून या संदर्भात मंचर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.199/2023 भा.द.वी.कलम 379 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास पोलिस हवलदार हिले हे करीत आहेत.
प्रतिनिधी - आकाश भालेराव
मंचर