Type Here to Get Search Results !

पेठ मोटारसायकल आणि टेम्पो चा अपघात , एक जण ठार



बाळू तुकाराम सोनवणे वय 55 वर्षे राहणार शिंगवे पारगाव, सोनवणे वस्ती तालुका आंबेगाव जिल्हा पुणे हे त्यांच्या जवळील हिरो होंडा प्लस मोटारसायकल नंबर MH12CU6075 ही घेऊन दिनांक 13/05/2023 रोजी दुपारी 1:45 वाजण्याच्या सुमारास पेठ तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथील हॉटेल रानवारा समोर पुणे नाशिक हायवे ने नाशिक बाजू कडून पुणे बाजूकडे जाणाऱ्या रोड ने मोटासायकल चालवीत घेऊन जात असताना पुणे दिशे कडून नाशिक दिशेला जाणार आयशर टेम्पो नंबर MH15DK6560 वरील चालक लक्ष्मण विष्णू सहाने राहणार नुरायम संकुल रो हाऊस नं 15 आंबडगांव तालुका नाशिक याने त्याच्या ताब्यातील आयशर टेम्पो अविचाराने, रहदारीचे नियमांकडे दुर्लक्ष करून हायवे रोड वरील दुभाजकच्या मधून अचानक नाशिक ते पुणे जाणाऱ्या लेनमध्ये घेऊन गेल्याने बाळू तुकाराम सोनवणे यांच्या कडील हिरो होंडा प्लस मोटारसायकल नंबर MH12CU6075 आयशर टेम्पोची एक मेकास धडक होऊन अपघात झाला असून या मध्ये बाळू तुकाराम सोनवणे यांच्या डोक्याला आणि हाताला मार लागून त्यांचा यात मृत्यू झालेला आहे या बाबत ची माहिती त्यांचा मुलगा दत्ता बाळू सोनवणे यांनी या संदर्भात सर्व माहिती मंचर पोलीस स्टेशन ला दिली व त्या प्रमाणे गु.र.नं 200/2023 भा.द.वी.कलम,279,337,338,427,304(A), मो.वा.का.कलम 184 प्रेमाने गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस हवालदार जांभळे हे करीत आहेत.


प्रतिनिधी - आकाश भालेराव

पेठ

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad