Type Here to Get Search Results !

निवळी प्रशिक बुद्धविहार येथे संयुक्त जयंती महोत्सव उत्साहात साजरा.



मंगळवार दि.१६ मे रोजी निवळी बौद्ध विकास मंडळ स्थानिक व मुंबई माता रमाई महिला मंडळ तसेच प्रशिक युवा यांच्या संयुक्त विद्यमाने भगवान गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांचा जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

प्रतीवर्षी प्रमाणे या वर्षी देखील जयंती महोत्सवासाठी निवळी गावातील नोकरीनिमीत्त बाहेर असणा-या चाकरामान्यानी हजेरी लावल्याने कार्यक्रम खुप दिमाखदार झाला.

सकाळी १० वा. बुद्ध वंदना घेउन बौद्धाचार्य,श्रामणेर आयु.प्रविणजी गोपाळ पवार यांनी अतीशय सुरेख प्रकारे मंगलमय विधी पार पाडली व त्यानंतर सभा घेण्यात आली. सभेचे अध्यक्षस्थान मुंबई मंडळाचे अध्यक्ष आयु.अनिलजी पवार यांनी भुषविले सुत्रसंचालन मुंबई मंडळ सहसचिव दिनेश पवार यांनी केले.

संयुक्त जयंतीचे औचित्य साधून गावचे नवनिर्वाचीत सरपंच मा. दैवत पवार यांचा पुष्पगुच्छ व संविधान प्रत देउन सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर महाराष्ट्र टेनिस क्रिकेट टिमचे प्रतिनिधीत्व करणारा स्टार क्रिकेटर रणजित पवार व युट्युबर अविनाश घडशी यांचाही सत्कार करण्यात आला.

मुंबई मंडळाचे अध्यक्ष अनिलजी शंकर पवार यांसकडून विहारासाठी मंडप कापड व धम्मपद पुस्तक भेट स्वरूपात देण्यात आले.उपाध्यक्ष आयु.संजयजी जाधव यांनी विहाराला अशोकचक्र भेट स्वरूपात दिले.त्याचबरोबर मुंबई मंडळाचे माजी उपाध्यक्ष मनोहरजी पवार यांनी विहाराला संविधान प्रास्ताविक भेट स्वरूपात दिली.

 सभेदरम्यान काही धम्मबांधव व धम्मभगिनी यांनी सर्वाना भरभरून शुभेच्छा देत अध्यक्षानी संबोधित करताना जीवनातील संघर्षाबद्दल महत्तवाचा संदेश दिला व महापुरूषांच्या विचारावर चालून स्वताचा व समाजाचा विकास साधन्यासाठीही शुभेच्छा दिल्या.

दुपारी १२ ते २ या वेळी सर्वांसाठी मनोरंजक खेळांचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये सर्वानी उत्साहात भाग घेत सायंकाळी ५ ते ७ या वेळेत डी.जे. च्या तालावर मिरवणुक काढण्यात आली.यामध्ये सर्वांनीच जल्लोषपुर्ण सहभाग नोंदवला.रात्री ९ ते १२यावेळेत सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

यामध्ये लहान मुले व महिला त्याचबरोबर उत्साही तरुणांनी विविध कलागुण सादर करण्यात आले व सांस्कृतिक कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अमर पवार गुरूजी यांनी केले.

एकूणच महापुरुषांच्या विचारांचा वारसा जपणा-या सर्व अनुयायीनी हा एक दिवशीय जयंती महोत्सव मोठ्या जल्लोशात साजरा केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad