संजय राऊत म्हणाले; जिंकेल त्याची जागा
पुणे लोकसभा पोटनिवडणुकीच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये घुसपूस सुरु आहे.
त्यावर संजय राऊत यांनी कसेल त्याची जमीन या प्रमाणे, जो जिंकेल त्याची जागा असे सूत्र ठरवावे. त्यानुसार "कसबा" प्रमाणे पुणे "लोकसभा" पोट निवडणुकीतही महाविकास आघाडी सहज जिंकेल. त्यामुळे जागांचा आकडा वाढविण्याचा अनाठायी हट्ट करण्यापेक्षा जिंकेल त्याची जागा याच सूत्राने महाराष्ट्र आणि देश जिंकता येईल. त्यासाठी प्रत्येकाने थोडा-थोडा त्याग करावा, असे मत व्यक्त केले आहे.