कर्नाटक प्रचारादरम्यान प्रणिती शिंदेंच्या सभेत गोंधळ
काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदेंच्या बेळगावतील देसूर गावात प्रचार सभेत मोठा गोंधळ उडाल्याची माहिती समोर येत आहे. प्रणिती शिंदेंच्या चालू सभेत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सदस्यांसह मराठी भाषिक सभास्थळी भगवे झेंडे घेऊन घोषणाबाजी करत सभा उधळून लावली. महाराष्ट्र एकीकरण समितीचे काही सदस्य हे कर्नाटक विधानसभा निवडणूक लढवित आहेत. तरीदेखील महाराष्ट्रातील इतर पक्षातील नेतेमंडळी प्रचारासाठी येत असल्याने मराठी भाषिक आणि समितीचे सदस्य हे आक्रमक झाले आहेत.