Type Here to Get Search Results !

पंढरपूर | श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या बायोगॅस प्रकल्प उद्घाटन व शेतकरी मेळाव्याचे आयोजन



पंढरपूर श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या बायोगॅस प्रकल्पाची भूमिपूजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वे सर्व अध्यक्ष श्री शरद पवार यांच्या उपस्थितीत भूमिपूजन व शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.




विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांनी ५ मे रोजी मुंबईत जाऊन शरद पवार यांची भेट घेतली व त्यांना बायोगॅस प्रकल्पाचे भूमिपूजन आणि शेतकरी मेळाव्याच्या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले.




ते निमंत्रण शरद पवार यांनी स्वीकारले असून ज्येष्ठ नेते शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पदाचा राजीनामा दिल्यानंतर मोठे खेळ उडाली होती या पार्श्वभूमीवर प्रथम ते एका सार्वजनिक कार्यक्रमासाठी पंढरपूरला येत असून त्यांच्या या कार्यक्रमाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष.




शरद पवाराचे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अतूट असे नाते आहे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीत शरद पवार यांचा मोठा सहभाग असून त्यांनी अनेक वेळा कारखान्यास मदतही केली आहे.

अलीकडच्या काळात विठ्ठल सहकारी साखर कारखाना दोन वर्षे बंद होता तो सुरू करण्यासाठी कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यानां ही त्यांनी मार्गदर्शन आणि मदत केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad