Type Here to Get Search Results !

माळशिरस | मिरे पाण्याचा टी खोलण्याच्या कारणावरून एकास मारहाण गुन्हा दाखल



माळशिरस | मिरे पाण्याचा टी खोलण्याच्या कारणावरून एकास मारहाण


माळशिरस | सोलापूर हणमंत किसन अभंगराव रा.14 सेक्शन,मिरे ता. माळशिरस जि.सोलापूर हे शेती वाट्याने घेऊन ती शेती करून आपला आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात दि. 04/05/2023 रोजी 4 वा सुमारास हणमंत किसन अभंगराव हे एका वेक्ती सोबत बोलत असताना तेथे , अमोल मारुती कोळी, गणेश अमोल कोळी व सुरज अमोल कोळी हे तिघे आले व हणमंत किसन अभंगराव यांना पाण्याचा टी तूच खोला आहे म्हणून शिवीगाळ व दमदाटी करून लाथाबुक्यांनी मारहाण करत अमोल मारुती कोळी याने हणमंत किसन अभंगराव यांच्या मोटासायकलवरील खोरे घेत खोऱ्याच्या तुंब्याने (दांडयाने) मानेवर आणि कंबरेवर मारले व ते तेथून निघून गेले हणमंत किसन अभंगराव यांच्या पत्नी ने उपचाराकरिता अश्विनी हॉस्पिटल अकलूज येथे ऍडमिट केले असून हॉस्पिटल मध्येच या बाबत चा जबाब हणमंत किसन अभंगराव यांनी पोलिसांना दिला असून , अमोल मारुती कोळी, गणेश अमोल कोळी व सुरज अमोल कोळी यांच्या विरुद्ध भा.द.सं. 1860 कलम 324,323,504,506,34 या प्रमाणे अकलूज पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद करण्यात आलेला असून पोलीस पुढील तपास करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad