संयुक्त जयंती महोत्सव उत्साहात साजरा
पंचशील उत्कर्ष मंडळ घोडेगाव आयोजित भव्य संयुक्त जयंती महोत्सव तीन दिवस आयोजित करण्यात आला होता.बुधवार दि.3/5/2023 रोजी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी किशोर वाघमारे हे होते लहान मुलांच्या चित्रकला स्पर्धा भाषण स्पर्धा नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या यामध्ये सर्व स्पर्धेत 120 स्पर्धांकांनी सहभाग घेतल्या.गुरूवार दि.4/5/2023 रोजी संविधान व महापुरुषांचा इतिहास या विषयावर धम्मप्रश्नावली स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यामध्ये 68 स्पर्धकांनी सहभाग घेतला तर सायंकाळी महिलांसाठी होममिनीस्टर हा खेळ घेण्यात आला यामध्ये सहभागी स्पर्धकास भेट वस्तू संघमित्रा बचत गटातर्फे देण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सुनीता सुर्यकांत वाघमारे ह्या होत्या .शुक्रवार दिनांक.5/5/2023 रोजी सकाळी महादेव वाघमारे गुरूजी ह्यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले .सुत्तपठ्ठण बौध्दाचार्य गणेश वाघमारे यांनी केले व समता सैनिक यांनी सर्व महापुरुषांना मानवंदना दिली.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी गौतम वाघमारे हे होते.सर्व स्पर्धकांचे बक्षीस वितरण कार्यक्रम व जेष्ठ नागरिक सत्कार सोहळा आणी गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा व ह.भ.प.विशाल महाराज फलके आणि कवी साहित्यिक महम्मद शकिल जाफरी यांना भिमरत्न पुरस्कार देण्यात आले.कार्यक्रमास मा.सभापती कैलास बुवा काळे सोमनाथ काळे रूपाली झोडगे सरपंच अश्विनी तिटकारे संगीता भागवत नंदा काळे अमोल काळे स्वप्निल घोडेकर क्रांती गाढवे वाल्हेकर सर माने सर तुकाराम काळे विकास मोरे सचिन ढोणे राजेंद्र ढोणे आतीश ढोणे संजय अंकुश तानाजी अस्वारे व तालुक्यातील भीम अनुयायी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन.मंडळाचे सचिव गणेश वाघमारे यांनी केले तर आभार कोषाध्यक्ष शाम वाघमारे यांनी मानले कार्यक्रमाचे नियोजन मंडळाचे अध्यक्ष महेश वाघमारे व सर्व सभासदांनी केले.
प्रतिनिधी - आकाश भालेराव
घोडेगाव