कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज कर्नाटकात २२४ जागांसाठी मतदान होत आहे. त्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदीसह भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी प्रचारात घाम आणि पैसा गाळून देखील भाजपचा दारुण पराभव होत आहे. हा पराभव म्हणजे 2024साठी शुभ शकुन असल्याचे भाकीत करत संजय राऊत यांनी ट्विट करून टोला लगावला.