मोहन मनोहर वाडेकर वय 55 वर्षे व्यवसाय शेती राहणार शिरोली तालुका खेड जिल्हा पुणे यांनी शिरोली गावच्या हद्दीत पुणे नाशिक रोडवर असलेल्या संकल्प मंगल कार्यालयाचे पार्किंग मध्ये पार्क केलेली अल्टो कार MH14BK 3815 या गाडीची पुढील ड्रायव्हर बाजूची काच कोणीतरी अज्ञात चोरट्याने फोडून गाडीचे नुकसान करून गाडीच्या डॅशबोर्ड खालच्या बॉक्समध्ये ठेवलेले6800/- रू त्या चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडलेली असून त्या अज्ञात चोरट्या विरोधात खेड पोलीस स्टेशन येथे भाग 5 गु.र. नं. 389/2023 भा. द. वि. कलम 379/427 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास पोलिस हावलदार घोलप हे करीत आहेत.
प्रतिनिधी - आकाश भालेराव
खेड