Type Here to Get Search Results !

होळकर जयंती निमित्त आनंदाचा शिधा वाटप करण्याची मागणी



                   31 मे रोजी देशभर साजरा होणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरातील जनतेला शासनाच्या वतीने आनंदाचा शिधा वाटप करण्यात यावा अशी मागणी गंगाखेड येथील जयंती उत्सव समितीच्या वतीने मुख्यमंत्र्याकडे निवेदनाद्वारे शुक्रवारी करण्यात आली. 




      दिवाळी, गुढीपाडवा या राष्ट्रीय सणासारखाच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्मदिवस संपूर्ण देशभर साजरा केला जातो. अहिल्यादेवी यांच्या कार्यकाळात माणसेच काय पण पशुपक्षी उपाशी राहू नयेत यासाठी विशेष प्रयत्न केले गेले. चारा छावण्या उभारण्याची संकल्पना सर्वप्रथम त्यांनीच मांडली होती. अशा महान कर्तृत्वान शूरवीर मातेच्या जयंती निमित्त वाडी वस्ती तांड्यावर राहत असलेल्या मेंढपाळ बांधवासह संपूर्ण राज्यभरातील जनतेला आनंदाचा शिधा वाटप करावा. जेणेकरून एक दिवस तरी आहे  गोडधोड खाऊन त्यांच्या आनंदात भर पडेल. अशी मागणी शुक्रवारी निवेदनाद्वारे करण्यात आली.




तहसीलदारांना दिलेल्या निवेदनावर परभणी लोकसभा मतदारसंघाचे 2024 उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर, मसनेरवाडीचे माजी सरपंच जयदेव मिसे,नारायणराव सरवदे, जनकिराम वाळवटे, प्रा मोतीराम देवकते, बालासाहेब नेमाने, संतोष दहिफळे आदींच्या स्वाक्षरी आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News