Type Here to Get Search Results !

सांगोला | आमदार शहाजीबापू आता चित्रपट काढणार..



 शहाजीबापू आता चित्रपट काढणार..


सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील सतत चर्चेत असतात. काय झाडी. काय डोंगर. च्या डायलॉगनंतर प्रकाशझोतात आलेले शहाजीबापू पाटील फेमस झाले आहेत. खा. संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीका करताना डायरी ऑफ खोका चित्रपट काढणार असल्याचे जाहीर करत शेलक्या शब्दात शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांचा समाचार घेतला. त्याला उत्तर देताना आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले, आपण चित्रपट काढणार आहे. त्या चित्रपटाचे नावही त्यांनी सांगितले. माकडाच्या हातात कोलित असे बापूंनी काढणाऱ्या चित्रपटाचे नाव आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे ते पुन्हा चर्चेत आहेत. आता बापूंच्या चित्रपटाला काय असणार. अभिनेते कोण-कोण असणार. नेमका हा चित्रपट कोणावर काढणार, अशी विचारणा आता कार्यकर्ते करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad