Type Here to Get Search Results !

ऊस वाहतुकदारांना फसवणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार



साखर कारखान्यासाठी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहन मालक वाहतूकदारांची ऊस तोडणीसाठी मजूर पुरवणाऱ्या ठेकेदार मुकादमांनी आर्थिक फसवणूक केल्यास संबंधित मुकादमावर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. याबाबतचे परिपत्रक मुंबई पोलीस महासंचालक कार्यालयाकडून राज्यातील सर्व पोलिस अधिक्षक कार्यालयांना जारी करण्यात आले आहे. डिसेंबर २०२२ मध्ये नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात आपण याबाबत लक्षवेधी सूचना मांडून शासनाचे लक्ष वेधले होते. प्रयत्नाला यश आले आहे. आमदार बबन शिंदे केलेल्या प्रयत्नाना यश आले आहे.


मागील काही वर्षांत ऊस वाहतूकदारांकडून ऊस तोडणी मजूर पुरवठा करणाऱ्या मुकादमांनी लाखो रुपये घेऊन तोडणी मजूर पुरवठा न करता आर्थिक फसवणूक करून वाहतूकदार वाहन मालकांना देशोधडीला लावले आहे. ऑक्टोंबर २०२२ मध्ये सोलापूर जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांचे चेअरमन, कार्यकारी संचालक व शेतकी अधिकारी यांची बैठक घेत या सर्व प्रकरणाला वाचा फोडली होती. तसेच हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडली होती. शेतकरी बांधव मजूर टोळ्या आणण्यासाठी घरातील सोने-नाणे गहाण ठेवून व व्याजाने पैसे काढून मुकादमांना देतात. परंतु मुकादम मजूर नपुरवताच आर्थिक फसवणूक करून वाहतूकदारावरतीच खोटे गुन्हे दाखल करतात, याकडे सर्वांचे लक्ष वेधले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad