Type Here to Get Search Results !

मंचर येथे घरफोडी सोन्याच्या दागिन्यां सोबत रोख रक्कमे ची चोरी



प्रवीण काशिनाथ कळंबे राहणार मंचर तपनेश्वर मंदिरा शेजारी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे यांच्या दिनांक 14/05/2023 रोजी रात्री 11 वा. ते दिनांक 15/05/2023 रोजी सकाळी 6:45 वाजण्याच्या सुमारास मंचर तपनेश्वर मंदिरा शेजारी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथून कोणी तरी अज्ञात चोरट्यांनी प्रवीण काशिनाथ कळंबे यांचे राहते घरातुन बंद घराचा दरवाजचे कुलूप तोडून आत प्रवेश करून कपाटातील ड्रॉवर मधील 3,00,000/- रू किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेले आहेत या मध्ये 1) 75,000/- रू किंमतीचे दिडतोळे वजनाचे सोन्याचे गळयातील मणी मंगळसुत्र काळया मणीमध्ये विनलेले त्यात दोन वाटया जु.वा.कि.अं.2)25,000/-रू.किंमतीचे पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे गळयातील मणी मंगळसुत्र काळया मणीमध्ये विनलेले त्यात दोन वाटया जु.वा.कि.अं.3)55,000/-रू.किंमतीचे एक तोळा वजनाचे सोन्याचे गळयातील नेकलेस जु.वा.कि.अं.4)25,000/-रू.किंमतीचे पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील वेल जु.वा.कि.अं.5)30,000/-रू.किंमतीचे सहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे मुलीच्या गळयातील चैन, त्यामध्ये बदाम आकाराचे सोन्याचे पॅन्डल जु.वा.कि.अं.6)18,000/-रू.किंमतीचे दोन ग्रॅम वजनाचे सोन्याचे मुलीच्या गळयातील रिंग जु.वा.कि.अं.7)72,000/-रू.रोख रक्कम त्यामध्ये 500 रू. व 100 रू.दराच्या नोटा

3,00,000/-रू.किं.चे सोने व रोख रक्कम व त्या नुसार मंचर पोलीस स्टेशन येथे या घरफोडी वरून अज्ञात चोरट्या विरोधात भाग 5 गु.र.नं 203/2023 भा.द.वी.कलम 457,380 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भालेकर हे करीत आहेत.


प्रतिनिधी - आकाश भालेराव

मंचर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad