Type Here to Get Search Results !

पंढरपूर | पटवर्धन कुरोली करकंब वरून येणारी 33/11 उपकेंद्र ची नवीन लाईन चालू करण्यासाठी आमरण उपोषण



पंढरपूर तालुक्यातील पटवर्धन कुरोली गावामध्ये करकंब वरून येणारी 33 11 उपकेंद्र ची नवीन लाईन चालू करण्यासाठी आमरण उपोषण आठ तारखेपासून सुरू करण्यात आले त्या उपोषणात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते कांतीलाल नाईक नवरे दशरथ जवळेकर भजनदास नाईक नवरे रामदास मोरे रामभाऊ खेडेकर धैर्यशील तात्या नाईक नवरे अतुल मोरे तसेच पटवर्धन करोली चे समस्त ग्रामस्थ तसेच सेवते व नांदोरेचे समस्त ग्रामस्थ यांनीही हजेरी लावली यामध्ये याच याच कामासाठी दीड वर्षांपूर्वी याच ठिकाणी असेच उपोषण केले होते




त्यावेळेस वीज महावितरण च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन देऊन आंदोलन स्थगित केले त्यानंतर सहा महिने पूर्ण झाल्यावर चौकशी केली असता काम पूर्ण झालेले नाही असे लक्षात आले अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर काही शेतकऱ्यांनी काम अडवले आहे असे निदर्शनास आले भेटीदरम्यान अधिकाऱ्यांनी काम अडवलेल्या शेतकऱ्यांवरती योग्य ती कारवाई करून पुढील दोन-तीन महिन्यात काम पूर्ण करून काम लाईन चालू केली जाईल असे तोंडी आश्वासन दिले त्यानंतरही काम पूर्ण झाले नाही हे लक्षात आल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पत्राद्वारे तीव्र आंदोलनाचा इशारा दिला त्यानंतरही त्यांनी लेखी आश्वासन दिले दिलेले आश्वासन न पाळता जाणून-बुजून दुर्लक्ष केले




अशा अनेक वेळा दोन वर्षापासून अधिकारी जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहेत तसेच लोकप्रतिनिधींनी ही याकडे दुर्लक्ष केले आहे त्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उपोषणाचा निर्णय घेऊन पटवर्धन कुरोली एम एस सी बी ऑफिस समोर आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad